कर्तुत्वसंपन्न व्यक्ती व संस्थांचा गौरव

। अलिबाग । वार्ताहर ।

ज्या लोक प्रतिनिधींकडून सर्वसामान्य जनतेची कामे होतात ते लोकप्रतिनिधी कायम निवडून येतात. रामकृष्ण मोरे यांनी शहरातील अनेकांना घडवले. पण त्यांच्या स्मृती ताज्या ठेवण्याचे काम फक्त आप्पांनीच केले, अशा भावना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केल्या. मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकाभिमुख कर्तव्यसंपन्न आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान झाला.

धनंजय वर्णेकर, जालंधर काळोखे, डॉ. अविनाश वाचासुंदर, राकेश सोनिगरा, वैशाली देशमाने, डॉ. अजित जगताप, आरती भेगडे, नीता मोहिते, खंडू भोंडवे, सुर्यकांत ताम्हाणे, खुशी मुल्ला, रामदास माळी, बसवराज कनजे, शिवदुर्ग मित्र लोणावळा ट्रेकिंग अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हेचर क्लब, एसकेएफ कामगार युनियन, सातारा मित्र मंडळ, गणेशम 2 सोसायटी, रामतीर्थ हौसिंग सोसायटी, रिचमंड सोसायटी यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, सिने अभिनेते अशोक समर्थ यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. कार्यक्रमासाठी खा. श्रीरंग बारणे, विश्‍वजीत बारणे, नामदेव जाधव, कविचंद भाट, नारायण बहिरवडे, निलेश तरस, मधुकर कंद, ज्ञानेश्‍वर दळवी, रवी नामदे, उदय आवटे, धनाजी बारणे, माऊली घोगरे, बाळासाहेब वाघमोडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version