| आगरदांडा | प्रतिनिधी |
गावातील स्वच्छतेच्या बाबतीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मुरुड तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सेजल घुमकर यांचा रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने अलिबाग येथे सत्कार करण्यात आला. रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत स्वच्छतेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांसमवेत कॉफी विथ विनर या कार्यक्रमात जिल्ह्यातील महिला सरपंच व सफाई कामगार यांचा बुधवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन शुभांगी नखाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आदींच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच घुमटकर व महिला सफाई कामगार यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. त्याबद्दल त्यांचा ग्रामसेवक प्रमोद म्हात्रे, सर्व सदस्य कर्मचारी तसेच माजी सरपंच अस्लम हलडे व अन्य ग्रामस्थांनी त्यांचे
अभिनंदन केले.







