तलाठी अंकुश साळवेंचा सन्मान

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव तालुका महसूल विभागातर्फे महसूल दिनाचे औचित्य साधून सन 2021-22 या महसूल वर्षांमध्ये महसूल विभागात उल्लेखनीय कामकाज केल्याने माणगाव उतेखोल सजाचे तलाठी अंकुश लक्ष्मण साळवे यांना सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम बुधवार, दि.3 ऑगस्ट रोजी गांधी मेमोरियल हॉल, निजामपूर रोड, माणगाव याठिकाणी पार पडला. उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांच्या हस्ते व तहसीलदार प्रियांका आयरे-कांबळे यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन श्री. साळवेंना सन्मानित करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार बी.वाय. भाबड, महसूल खात्याचे तलाठी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, लेखनिक यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version