शेताच्या बांधावर शेतकर्‍यांचा सन्मान

खालापूर प्रेस क्लबचा स्तुत्य उपक्रम
| चौक | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील शेतीत अभिनव उपक्रम राबवून विविध पिके घेणार्‍या प्रगतशील शेतकरी यांचा शेताच्या बांधावर जाऊन सन्मान करण्याचा कार्यक्रम खालापूर प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आला.

प्रेस क्लबचे अध्यक्ष एस.एम. देशमुख व रायगडचे संस्थापक ज्यांच्या संकल्पनेतून शेताच्या बांधावर शेतकरी सन्मानचे प्रणेते दिगवंत पत्रकार संतोष पवार यांनी सुरू केलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील शेतीत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पिके घेणार्‍या दोन शेतकरी योगेश वसंत फाटे, गाव कोपरी व आनंदीबाई देवेंद्र सावंत, गाव वडवळ यांचा सत्कार तालुका कृषी अधिकारी अर्चना नारवनकर-सुळ, खालापूर प्रेसचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, पत्रकार भाई ओव्हळ, मुकुंद बेंबडे, जितू सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आला. या दोन्ही शेतकर्‍यांनी भात, भाजीपाल्याव्यतिरिक्त शेतात विविधता आणली असून, अनेक प्रकारची पिके घेत आहेत. शेतीबरोबर कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, केळी व हळद लागवड करीत असून, त्यांचा केलेला सत्कार योग्य शेतकरी याचा आहे, असे कृषी अधिकारी अर्चना नारवनकर-सूळ यांनी सांगितले. आम्ही फक्त पत्रकारिता न करता मेडिकल कॅम्प, शैक्षणिक मदत, अपघातग्रस्तांना मदत, शेतकरी यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सन्मान करीत असल्याचे खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी सांगितले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, शेतकरी, पत्रकार, कृषीमित्र उपस्थित होते.

Exit mobile version