| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळमध्ये विविध स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी झालेल्या तरुणांचा सन्मान आम्ही आगरी युवा ग्रुपकडून करण्यात आला. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झालेला तरुण तसेच, आर्मीमध्ये निवड झालेले दोन तरुण आणि मेडिकल शिक्षण पूर्ण करणारी तरुणी अशा चार तरुणांचा त्यांच्या घरी जावून सन्मान करण्यात आला.
नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत तालुक्यातील आंबोट गावातील तरुण निलेश मसणे यांनी लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षेचा अडथळा दूर करीत पोलीस निरीक्षक पदावर निवड झाली. नेवाळी गावातील तरुण दर्शन बागडे यांची निवड आर्मीमध्ये झाली. तर तालुक्यातील कोदीवले गावातील बाळाजी राणे या तरुणाची देखील आर्मीमध्ये निवड झाली. उत्तम कोळंबे यांची कन्या श्रुती हिने बीएएमएसपर्यंत शिक्षण पूर्ण केले म्हणून त्यांच्या घरी जावून सन्मान करण्यात आला.
आम्ही आगरी ग्रुपचे केशव मुने, मनीषा दळवी, संतोष पेरणे, मनोहर हजारे, सज्जन गवळी, कैलाश थेर, सुभाष नाईक, हरेश सोनावळे, हेमंत कोंडीलकर, योगेश कांबरी, यांच्यासह मिलिंद विरले, अंकुश शेळके, संदीप म्हसकर, विलास डुकरे, किशोर घारे, भगवान जामघरे, संदीप मसणे, संतोष धुळे, अंकुश दुर्गे, आदी सदस्य उपस्थित होते.