महिला कर्मचार्‍यांच्या कामाचा गौरव

| सारळ | वार्ताहर |
रायगड डाक विभागाने चालू आर्थिक वर्षात ज्या महिला कर्मचारीवर्गाने खात्याच्या कामकाजात उत्कृष्ट योगदान दिले, त्यांचा सत्कार करुन महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला. दरम्यान, जिल्हा डाक अधीक्षक डॉ. संजय यांच्या हस्ते नीलिमा पाटील, अस्मिता पाटील, संजणा म्हात्रे, सरिता म्हात्रे, मृणाल सावंत, रुपाली साळुंखे, ज्योति बावकर, सुवर्णा सर्कले, सरोज रूमडे, निकिता ढोकले, सुप्रिया कल्याणकस्तुरे, श्रीदेवी गोडे, मिना म्हात्रे, स्वाती श्रीकांत घरत, पूनम शेडगे, शालिनी सावंत, रजनी ठाकूर, निलम पाटील, अदिती पाटील, रसिका सावंत व अपूर्वा दुसाणकर-स्वच्छतादूत यांचा गुणगौरव करण्यात सोबत डाक कार्यालयातील पुरुष कर्मचारीवर्गाच्या पत्नी व आईला यशस्वी व्यक्तीमागील प्रेरणा म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी पाककला, प्रश्‍नमंजुषा, ग्रुप डिस्कशन अशा विविध स्पर्धा घेऊन कर्मचारीवर्गाला प्रेरणादायक पारितोषिक दिली. समीर म्हात्रे, ज्ञानेश राजे, नागेश साखरकर, मनोज अंबुरे, सोमनाथ आकरिक, अनिल नाईक, नीलेश पाटील, शिशिर म्हात्रे, मनोज कुमार यांनी कार्यक्रम यशस्वी मेहनत घेतली.

Exit mobile version