पनवेलच्या साहित्यिकांचा सन्मान

पुस्तके ग्रंथ निवड यादीत
। पनवेल । वार्ताहर ।
शासनाची ग्रंथ निवड समितीची 2019 व 20 ची यादी नुकतीच जाहीर झाली. या यादीमध्ये गजल पंढरी म्हणून ओळख असलेल्या पनवेलमधील पाच साहित्यिकांच्या सात पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे.

यामध्ये 2019 च्या यादीत ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख यांनी संपादित केलेल्या गजलवेल या पनवेलमधील 15 गजलकारांच्या गजलांचा समावेश असलेल्या प्रातिनिधिक गजलसंग्रहाचा समावेश आहे. त्याचबरोबर कोमसाप पनवेल शाखेचे अध्यक्ष रोहिदास पोटे यांच्या स्वप्नातले किनारे , उपाध्यक्ष डॉ. अविनाश पाटील यांच्या माहौल, दिवाकर वैशंपायन यांच्या अमृत मंथन या गजलसंग्रहांचा, तसेच कोमसाप पनवेल शाखेचे युवाशक्ती प्रमुख संदीप बोडके यांच्या उजळली सांजवेळ या कादंबरीचा समावेश आहे. 2020 च्या यादीमध्ये ए. के. शेख यांच्या गजलवेदना – एक आस्वादक समीक्षा. तसेच मकविता माझी सखीफ या पुस्तकांचा समावेश आहे. पनवेलमधील या साहित्यिकांच्या पुस्तक निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version