शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणार्‍यांचा सन्मान

। चिरनेर वार्ताहर । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चिरनेर येथील पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या परशुराम धाकू खारपाटील विद्यालयाचे चार विद्यार्थी आणि कळंबुसरे येथील प्राथमिक शाळेचे चार विद्यार्थी उत्तीर्ण होऊन, यश संपादन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापक सुरदास राऊत यांनी दिली.

यात अक्षरा जितेंद्र ठाकूर हिने या परीक्षेत 298 पैकी 234 गुण मिळविले. तर शेकडा गुण 78.52 टक्के गुण मिळवून,शाळेत प्रथम आणि तालुक्यातही गुणानुक्रमे प्रथम येण्याचा मान तिने पटकाविला आहे. तर जिज्ञेशा राकेश फुंडेकर हिने या परीक्षेत 298 पैकी 154 गुण मिळवून शेकडा गुण 51. 67 टक्के तसेच यश उदय ठाकूर याने 298 पैकी 152 गुण मिळवले.त्याला शेकडा गुण 51.00 टक्के तर दिया राजेंद्र चिर्लेकर हिने 298 पैकी 148 गुण मिळवले , तिला शेकडा गुण 49.66 टक्के गुण प्राप्त झाले.

दरम्यान अविष्कार पाटील,श्रीमत पाटील, सूर्य पाटील व सोनाक्षी पाटील या कळंबुसरे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले असून, हे चारही विद्यार्थी सध्या चिरनेर येथील परशुराम धाकू खारपाटील माध्यमिक विद्यालयात सहावी इयत्तेत शिक्षण घेत आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थापक-अध्यक्ष पी.पी.खारपाटील, राजेंद्र खारपाटील, समीर खारपाटील, सागर खारपाटील, सुरदास राऊत, आनंद चिर्लेकर तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहेत.

Exit mobile version