| नेरळ | प्रतिनिधी |
युनायटेड वे मुंबई संस्थेचे माध्यमातून आणि ओवेन्स कोर्निंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अर्थसहाय्यीत, समग्र ग्राम विकास कार्यक्रम तसेच जल संजीवनी प्रकल्प कर्जत अंतर्गत पाथरज ग्राम पंचायत येथील मार्गाचीवाडी जांभूळवाडी येथे शेतकरी महिला यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. गावात उत्तम कामगिरी करणार्या स्वयं सहायता गटांचे सत्कार ङ्गसन्मान चिन्हफ देऊन करण्यात आले.
युनायटेड वे मुंबई ही संस्था मशरूम उत्पादन, रोपवाटिका, शेळीपालन, कुक्कुटपालन, गांडूळखत निर्मिती प्रकल्प, शिवणकाम अशा विविध रोजगाराभिमुख उपक्रम राबवीत आहे. उपक्रम राबविण्यामागचा उद्देश हा महिला स्वयं सहाय्यता समूहच्या माध्यमातून फक्त बचती पुरते मर्यादित न राहता व्यवसायाभिमुख प्रशिक्षित करून रोजगार निर्मितीद्वारे त्यांचे जीवनमान उंचावणे आहे. महिला दिनाच्या कार्यक्रमात आदिवासी दुर्गम भागातील पाथरज, खांडस, अंभेरपाडा, नांदगाव आणि वारे ग्रामपंचायत मधील एकूण 12 गावातील 19 गटातील 136 महिलांच सहभाग आहे. संस्था राबवीत असलेल्या संकल्पनेची प्रशंसा केली.
या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र, कशेळे शाखेच्या व्यवस्थापिका अश्विनी गजभिये, बँक सखी आशा निकाळजे, प्रकाश नर्सरीच्या संस्थापिका नयना कीर, हर्षदा जाधव सरिता ऐनकर, सुरेखा ऐनकर,संगीता थोराड, कविता काठे, राजश्री तिटकारे, यशोदा ऐनकर या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जोएब दाऊदी यांनी केले तर आभार विवेक कोळी यांनी केले.
कृषी अभियंता निवृत्ती गुडेकर, गायत्री ऐनकर, श्वेता जाधव, जयश्री ऐनकर, संतोष काठे, दिपक कवठे, अमर पारधी, जगदीश भला आणि प्रमोद धादवड आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.