। महाड । प्रतिनिधी ।
स्वावलंबन फाऊंडेशनच्यावतीने कर्तृत्वान महिलांना अष्टभुजा स्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक महाड येथे शनिवारी हा कार्यक्रम संपन्न झाला. कोकण जनसंपर्क प्रमुख आणि स्वावलंबन प्रशासन मीनाक्षी शिंदे यांनी या कार्यक्रमाचे अयोजन केले होते.
हा पुरस्कार देशातील विविध विभागांतील आठ महिलांना प्रदान करण्यात आला. महिलांच्या आर्थिक,मानसिक वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आणि व्यावसायिक उन्नतीच्या ध्येयाने कार्य करीत असलेल्या स्वावलंबन फाऊंडेशनने गेल्या सहा महिन्यांमध्ये आपले कुटुंब आणि वैयक्तिक जबाबदार्या सांभाळत कार्य करीत असलेल्या पदाधिकार्यांना अष्टभुजा स्त्री सन्मान पुरस्कार घोषित केला जातो. यामध्ये नूतन मिस्त्री, मीनाक्षी शिंदे(रायगड), अंजली ब्रम्हे, मानसी वेदक, उज्वला सुकाळी,अर्चना संजय गुरव,गायत्री मराठे,कोमल पारेख यांचा समावेश होता. यावेळी स्वावलंबन फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय पोवळे, विभा परब, आ. भरत गोगावले, सोनाली कोदे,ममता बागेवाडी, वनिताजी चव्हाण,अर्चना हिंदळेकर, पूजा इंदुलकर, अनुजा कुलकर्णी,निता शेट, डॉ, जागृती कांबळे, अॅड. अंकिता डावरुंग. शिला साबळे, जितेन्द्र सावंत उपस्थित होते.सबरिन ईसाने, अमृता पाथरे, श्रावणी मांडवकर,पोर्णिमा जंगम. प्रिती देशमुख. जान्हवी राणे यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसचालन मिलन निकम, स्मिता जोष्टे यांनी केले.
स्वावलंबन फाऊंडेशनकडून स्त्रीयांचा सन्मान
