| उरण | प्रतिनिधी |
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. समाजातील सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा योग्य मानसन्मान व्हावा, त्यांच्या कार्याची इतरांना ओळख व्हावी, महिलांना समाजात पुढे जाण्याची प्रेरणा मिळावी, समाजातील शेवटच्या घटकाला मान सन्मान मिळावा, न्याय मिळावा या अनुषंगाने या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी नऊ महिलांचा (नवदुर्गांचा) सन्मान करण्यात येतो. याही वर्षी संस्थेच्या माध्यमातून रँकर्स अकॅडमी, कोप्रोली चौक, उरण येथे नवदुर्गांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी समिधा निलेश म्हात्रे (सामाजिक क्षेत्र), डॉ. जागृती म्हात्रे (वैद्यकीय क्षेत्र), तृप्ती भोईर (पत्रकारिता), हेमांगी नरेश म्हात्रे (शेतकरी क्षेत्र), निर्मला नरेश म्हात्रे (आशा वर्कर), हर्षा लीलाधर ठाकूर (स्वच्छता कर्मचारी), ऍड. माधवी पाटील (न्यायदान क्षेत्र), निर्मला मच्छिंद्रनाथ घरत (शिक्षण क्षेत्र), अपर्णा अंकित म्हात्रे (पोलीस प्रशासन) या नवदुर्गांचा शाल, गुलाब पुष्प, प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह, साडी देऊन सत्कार करण्यात आला.
नवदुर्गांचा सत्कार सोहळा
