। खोपोली । वार्ताहर ।
खोपोली येथील सहजसेवा फाउंडेशनने कोरोना व आपत्ती काळात केलेल्या कार्याबद्दल जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे पालकमंत्री अदिती तटकरे व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते तर खालापूर तहसील कार्यालय येथे खालापूर तालुक्याचे तहसीलदार ईरेश चप्पलवार व खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते याचसोबत खोपोली नगर परिषद खोपोली यांच्या माध्यमाने नगराध्यक्षा सुमन औसरमल,मुख्याधिकारी गणेश शेटे, उपनगराध्यक्षा विनिता कांबळे व सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सहजसेवेच्या मदत कार्यात सहयोग देणार्या सर्वाना हा सन्मान समर्पित केल्याची भाकना सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांनी व्यक्त केली.