। मुंबई । प्रतिनिधी ।
दादर प्लाझा जवळ बेस्टच्या भाडे तत्वावरील विद्युत बसचा अपघात झाल्याची घटना सोमवारी (दि.8) सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात चार पादचाऱ्यांना धडक बसली. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातामुळे कंत्राटी चालकाच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्तात उभ्या असलेल्या जेसीबीवर बस आदळली आहे. अपघातात मोटार सायकल सह काही चारचाकी गाडयांना बसची धडक बसली आहे. या अपघातामुळे प्रवाशामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसचा प्रवास दिवसेंदिवस धोक्याचा होत आहे.
मुंबईत बेस्ट बसचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
