माथेरानमध्ये घोडा नेत्र तपासणी शिबीर

| माथेरान । वार्ताहर ।

माथेरानमध्ये हॉटेल माउंट ग्राऊंड हॉर्सलँडजवळ (दि.15) घोड्याचे नेत्र तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. जगप्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉ. रिचर्ड जे. मॅकमुलेन यांच्यासह डॉ. कस्तुरी भडसावळे (द आय व्हेटच्या संस्थापक) आणि त्यांची टीम आरोग्य तपासणी शिबिराला भेट देतील विशेषत: माथेरानच्या घोड्यांची नेत्रतपासणी करण्यासाठी (दि.8) महाबळेश्‍वरमध्ये उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर ते माथेरानला नेत्रतपासणीसाठी येणार आहेत आणि गरज पडल्यास प्राथमिक नेत्रसेवा सल्लामसलत करणार आहेत.

द आय व्हेटफ भारतातील पहिले आणि एकमेव विशेष पशुवैद्यकीय नेत्रचिकित्सा क्लिनिक आहे जे सल्लामसलत, निदान चाचण्या, प्रगत नेत्ररोग शस्त्रक्रियांसह प्राण्यांसाठी संपूर्ण डोळ्यांची काळजी प्रदान करते. अत्याधुनिक क्लिनिकमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत ज्यात प्रगत ऑपरेटिंग थिएटर्सचा समावेश आहे जे आंतरराष्ट्रीय मानदंडांच्या पलीकडे सुसज्ज आहेत.

भारतातील अग्रगण्य पशुवैद्यकीय नेत्रतज्ज्ञ डॉ. कस्तुरी भडसावळे यांनी 2018 मध्ये द आय व्हेटची स्थापना केली. डॉ. कस्तुरी या मुंबईतील पशुवैद्यकीय पदवीधर आहेत आणि त्यांनी इस्रायल आणि यूएसएमध्ये पशुवैद्यकीय नेत्रविज्ञानामध्ये पुढे प्रशिक्षित केले आहे, द आय व्हेट मुंबई आणि पुणे येथे कार्यरत आहे आणि आठवड्यातून सहा दिवस खुले असते.

Exit mobile version