। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत विधानसभा मतदारसंघात गृह मतदान करण्याची संमती दर्शविलेल्या 70 मतदारांनी बुधवारी (दि.8) गृह मतदान केले. निवडणूक विभागाकडून नेमण्यात आलेल्या पाच टीमकडून 85 वर्षे वयावरील आणि चालता येत नसल्याने दीव्यांग मतदार यांचे मतदान करून घेतले. अशाप्रकारे मावळ लोकसभा मतदारसंघात वृध्द आणि दीव्यांग मतदान यांनी मतदान करून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात केली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने यावर्षी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी वृध्द मतदार आणि चालता येत नसलेले दीव्यांग मतदार यांचे गृह मतदान करून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी आयोगाने केलेला आवाहनानुसार 189 कर्जत विधानसभा मतदारसंघात 85 वर्षे वयावरील 59 आणि दीव्यांग असलेल्या चालता तसेच हालचाल करता येत नसलेल्या 11 मतदारांनी घरी मतदान करण्याचा पर्याय निवडला होता. मावळ लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. मात्र, गृह मतदान करून घेण्यासाठी निवडणूक विभागाकडून काही तारखा निवडणूक लढवत असलेले 34 उमेदवार आणि संबंधित मतदार यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कर्जत मतदारसंघात निवडणुक विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी संबंधित मतदारांच्या घरी जावून मतदान प्रक्रिया पार पाडली.
कर्जत विधानसभा मतदारसंघात 43 मतदान केंद्रांवरील 70 मतदारांचे त्यांचे संमतीने गृह मतदान करून घेण्यात आले. त्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराले यांचे मार्गदर्शनाखाली खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी हे या पथकाचे प्रमुख होते. सकाळी कर्जत तालुका आणि खालापूर तालुक्याचा काही भाग यात निवडणूक यंत्रणेकडून पाच टीम सकाळी आठ वाजता मतदारांच्या घरी पोहचल्या. त्यांच्याकडे गृह मतदान करून घेण्यासाठी मतपत्रिका, गुप्त मतदान प्रक्रिया पार पाडता यासाठी पुठ्ठ्याचे कव्हर तसेच मतपेटी अशी सर्व यंत्रणा घेउन हे कर्मचारी गृह मतदान करून घेण्यासाठी पोहचले. साधारण प्रत्येक मतदानासाठी दहा मिनिटांचा अवधी लागत होता. 85वर्षे वयावारील काही मतदार हे अंथरुणाशी खिळून होते, तर काही मतदार यांचे हात पायांना व्यंग आल्याने त्यांनी आपल्या कुमावळ लोकसभा मतदारसंघात गृह मतदानाने मतदान प्रक्रिया सुरू झाली.