| पनवेल | वार्ताहर |
खारघर वसाहत सेक्टर 14 येथील रघुनाथ विहार या सोसायटीमधील एका सदनिकेत घरकाम करणाऱ्या महिलेने तब्बल पाच लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली आहे. या प्रकरणी खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सेक्टर 14 येथील रघुनाथ विहार या सोसायटीमध्ये राहणाऱ्या 68 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीमध्ये त्यांच्या घरात काम करण्यासाठी नेमलेल्या महिलेने कपाटामध्ये ठेवलेल्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणी घरकाम करणाऱ्या महिलेवर कारवाई केली. पोलिसांनी कामगारांचे चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र तपासण्याचे आवाहन केले आहे.







