विश्‍वासघातकी लोक हिंदू कसे?- ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद

| मुंबई | प्रतिनिधी |

उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्‍वासघात झाला आहे. जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत दु:ख जाणार नाही, अशी प्रतिक्रिया ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर दिली. कोणाचं हिंदुत्व खरं हे समजून घ्यावे लागेल. पण, जो विश्‍वासघात करतो, तो कधी हिंदुत्ववादी नसतो, असेही शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद म्हणाले.

शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद म्हणाले, आपण सगळे हिंदू आणि सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत. पुण्य-पापाची भावना आपल्याकडे सांगितली आहे. सगळ्यात मोठा घात हा विश्‍वासघात असतो. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्‍वासघात झालेला आहे, याबाबतची पीडा अनेकांना आहे. त्यांच्या निमंत्रणानंतर मी मातोश्रीवर आलो, त्यांनी माझं स्वागत केलं. मी त्यांना सांगितलं, जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर खुर्चीवर परत बसत नाहीत, तोपर्यंत लोकांच्या मनातील दुःख कमी होणार नाही. कोणाचं हिंदुत्व खरं हे समजून घ्यावे लागेल. पण, जो विश्‍वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो. जो विश्‍वासघात सहन करतो तो हिंदू असतो. जनतेचासुद्धा अपमान करण्यात आलेला आहे, जनमताचा अनादर करणे हे चुकीचे आहे.

Exit mobile version