प्रीमिअर लीगमध्ये कसे खेळता

| मुंबई | प्रतिनिधी |

भारतीय खेळाडूंचे इतके लाड केले जाऊ नये, बीसीसीआयने क्रिकेटपटूंना कठोर ताकीद देणं गरजेचं आहे. तुम्ही तंदुरुस्त असल्यास, कामाचा भार कसा येतो? खेळाडूंचे लाड करणे थांबवा. तुमची टीममध्ये निवड केली जात आहे, तुम्हाला रिटेनर फी दिली जात आहे. जर तुम्ही कामाच्या ओझ्यामुळे खेळू शकत नसाल तर रिटेनर फी देखील घेऊ नका असे ज्येष्ठ क्रिकेटर्स सुनील गावस्कर यांनी स्पष्ट सांगितले आहे.

भारतीय क्रिकेट संघाला वर्कलोड मॅनेजमेंट जमत नाही या कारणातून आता बाहेर पडण्याची गरज आहे असे म्हणत सुनील गावस्कर यांनी टीकास्त्र उगारले. पुढे गावस्कर म्हणतात की, हेच खेळाडू जेव्हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतात तेव्हा अशी ताण तणाव, कामाचं दडपण विसरतात. तुम्ही आयपीएलच्या संपूर्ण हंगामात खेळता, प्रवास करता. तुम्हाला तिथे कंटाळा येत नाही का? कामाचं ओझं वाटत नाही का? केवळ जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता, विशेषत: जेव्हा तुम्हाला नॉन-ग्लॅमरस देशाचा दौरा करावा लागतो तेव्हा तुम्हाला कामाचा ताण आठवतो? असा प्रश्‍न गावस्कर यांनी केला आहे.

तसेच जेव्हा तुम्ही विश्‍वचषक जिंकू शकत नाही, तेव्हा संघात बदल होतील. न्यूझीलंड संघात बदल करण्यात आले आहेत, असे म्हणत गावस्कर यांनी संघात बदल होण्याचेही संकेत दिले आहेत.

Exit mobile version