। पनवेल । प्रतिनिधी ।
एचपी गॅस ग्राहकांना ई- केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ग्राहकांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही तर गॅस सिलेंडर मिळण्यात अडथळा येऊ शकतो किंवा पुरवठा बंद होऊ शकतो. ग्राहकांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, नोंदणीकृत मोबाईल नंबर, ग्राहकाचा फोटो घेऊन ई-केवायसी करणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर एचपी गॅस ग्राहकांनी ई- केवायसी करून घेणे आवश्यक असल्याचे आरडी एचपी गॅसचे खांदा कॉलनी येथील राम ढोबळे यांनी म्हटले आहे.
एचपी गॅस ग्राहकांना ई- केवायसी करण्याचे आवाहन
