| खांब | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे दिवाळी या गावातील ह्रतिक येरूणकर याने बॉडी बिल्डिंगमध्ये तीन कांस्यपदक पटकावून यश संपादित केले आहे. गोरेगाव-मुंबई येथे संपन्न झालेल्या व मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत जवळपास 600 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातून ह्रतिक येरूणकर याने 60 किलो वजनी गटात आपल्यातील कलाकौशल्याचे प्रदर्शन करून कांस्यपदकाची कमाई केली. ह्रतिकच्या या यशाबद्दल ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, तरूण मंडळ, श्री समर्थ नगर उत्कर्ष मंडळासह श्री समर्थ नगर आंबेवाडी येथील सर्व रहिवासी वर्ग व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी त्याचे अभिनंदन व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत.







