जगज्जेता संघ होणार मालामाल

आयसीसीकडून टी-20 विश्‍वचषक स्पर्धेच्या बक्षिसांची घोषणा
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
ओमान आणि यूएईमध्ये होणार्‍या पुरुषांच्या टी-20 विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेची मरनफधुमाळी 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 14 नोव्हेंबरला जगज्जेतेपदाचा फैसला होणार आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने बक्षीस रकमेची घोषणा केली असून जगज्जेता संघ मालामाल होणार आहे. विजेत्या संघाला 1.6 दशलक्ष डॉलर्स म्हणजे जवळपास 12

कोटी, तर उपविजेत्या संघाला 8 लाख डॉलर्स म्हणजेच 6 कोटी रुपये मिळणार आहेत.
यंदाच्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत 16 संघ कौशल्य पणाला लावणार असून विजेत्यांवर एकूण 5.6 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 42 कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. उपांत्य फेरीतील पराभूत संघाला 4 लाख डॉलर्स म्हणजे 3 कोटी रुपये मिळणार आहेत. स्पर्धेत सुपर-12 च्या फेरीनंतर प्रत्येक विजयासाठी संघांना बोनस मिळणार आहे. सुपर-12 च्या प्रत्येक 30 सामन्यांतील विजेत्या संघाला 40 हजार डॉलर्स दिले जातील. या टप्प्यात नॉकआउट होणार्‍या संघांना 70 हजार डॉलर्स मिळतील.


पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचे अभियान
यंदाच्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत हिंदुस्थानी संघ दुसर्‍या गटात आहे. या गटात हिंदुस्थानसह पाकिस्तान, न्यूझीलंड व अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. या गटात इतर दोन संघ पात्रता फेरीतून येणार आहेत. टीम इंडिया 24 ऑक्टोबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने आपल्या अभियानास प्रारंभ करणार आहे. दुबईत होणार्‍या या हायव्होल्टेज लढतीकडे अवघ्या क्रिकेटविश्‍वाचे लक्ष असणार आहे.

Exit mobile version