| रेवदंडा | प्रतिनिधी |
महाशिवरात्री निमित्ताने अलिबाग तालुक्यातील चौल येथील दक्षिण काशी अशी ओळख असलेले श्री रामेश्वर मंदिर व परिसर विद्युत रोषणाई, रांगोळी, तसेच फुलमाळांनी सजविण्यात आला होता. महाशिवरात्री निमित्ताने श्री रामेश्वर मंदिर येथे जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. या निमित्त फुल विक्रेते, खेळणी, चणवाले, फेरीवाले, तसेच स्विटमिठाई वाल्यांनी दुकाने थाटली होती. दरम्यान, मंदिरात पुजाअर्चा व दर्शनासाठी मोठ्या भक्तीमय वातावरणात भक्तमंडळींनी गर्दी केली होती. पंचक्रोशीतील अनेक भक्तमंडळींनी श्री रामेश्वर मंदिरात दर्शनाचा लाभ घेतला.
श्री रामेश्वर मंदिरात अलोट गर्दी
