सुदैवाने जीवितहानी टळली
| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा नगरपंचायत क्षेत्रातील दुर्गवाडी येथील डम्पिंग ग्राऊंडमधील साचलेल्या कचर्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही आगीची दुर्घटना घडली आहे. डम्पिंग ग्राऊंडला आग लागल्यानंतर परिसरात धुराचे लोट पसरले. ग्राऊंडला आग लागल्यानंतर धूर परिसरात धुमसू लागला. या आगीची माहिती मिळताच माणगाव आणि श्रीवर्धन येथील अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, नगराध्यक्ष संजय कर्णिक हेदेखील नगरसेवक आणि नगरपंचायत कर्मचारी यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. रात्रीच्या सुमारास लागलेली आग दुसर्या दिवशी दुपारपर्यंत विजवण्यात अग्निशमन दलाला यश आले. परंतु, वार्यामुळे ही आग अजूनही धुमसत आहे. स्थानिक वीटभट्टीवाले आणि नागरिकांनी तत्पर पाण्याची सोय करून आग विजवण्यात मदत केली.