तायक्वांदो स्पर्धेत उदंड प्रतिसाद

| रसायनी | वार्ताहर |

अमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन ऑफ रायगड आणि जिल्हास्तरीय तायक्वांदो राष्ट्रवादी चषक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धा मोहोपाडा येथील जनता विद्यालय शाळेच्या खुल्या सभामंडपात रविवारी (दि.23 एप्रिल) आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेचे उदघाटन वरीष्ठ पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संदीप मुंढे, सचिन माळी,उमाताई मुंढे, अमित शहा, तात्या म्हस्कर, अनिल पिंगळे, वर्षाताई पाटील, मुख्याध्यापक वारे सर, दत्तात्रेय जांभळे, नंदकुमार कुरंगळे,रोटरी माजी अध्यक्ष गणेश काळे, रेश्मा चौधरी, सोनाली गोपाळे,प्रज्ञा भगत,रिना मॅडम, तुळशीदास पाटील,नंदू पाटील,सुदाम मु़ंढे,कैलास म्हात्रे, पांडुरंग पारंगे,शिक्षक आर.बी पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष मैदर्गींकर, डॉ मिलिंद भगत, देविदास म्हात्रे, विनायक डवळे,काळे सर,धनाजी जांभळे,रोशन म्हात्रे,प्रकाश माळी आदीसह वरद टॉवर प्रतिनिधी उपस्थित होते.राष्ट्रीय पंच अ‍ॅड प्रज्ञा संदिप भगत,संजय भोईर, सचिन माळी,रोहित सिलनकर यांनी काम पाहिले.

विजयी खेळाडू
*सुवर्णपदकः लावण्या देशपांडे,ऋचा वाकरे,जानवी कांबळे,अर्ना ठोंबरे,राशी कांबळे
*रौप्य पदकःपोर्णिमा ढवळकर,ऐश्‍वर्या राठोड, रश्मी जैस्वाल,परी ढवळकर,सानवी गागरे,अनन्या गायटे
कांस्यपदक ः सुश्रिया महिंद्रकर,रीतिका रॉय,भार्गवी ठाकूर,गिरीजा साळुंके, दुर्वा मुरुडकर, दुर्वा जांभळे,पार्थवी ठोंबरे

Exit mobile version