| नवी मुंबई | वार्ताहर |
योग प्रशिक्षणात अग्रेसर असलेल्या आर्ट ऑफ लर्निंग फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत देशातील आणि परदेशातील स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ही स्पर्धा नेरुळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवनमध्ये पार पडली. सुदृढ आरोग्यासाठी योगाचा प्रसार करण्यात आघाडीवर असलेल्या आर्ट ऑफ लर्निंग फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी ही स्पर्धा घेतली जाते. यंदा या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा फाऊंडेशनच्या अध्यक्षा योग गुरू डॉ. रिना अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या प्रसंगी डॉ. प्रताप मुदलीयार, दिनेश अग्रवाल, डॉ. सुभाष हिरा, बांधकाम व्यावसायीक राजेश प्रजापती, संजीव सूर्यवंशी, डॉ. अलोक मिश्रा, डॉ. नमिता मिश्रा, डॉ. संजय साटम, प्रकाश जावळे आदी उपस्थित होते.







