मनसे चषक क्रिकेट स्पर्धेला उदंड प्रतिसाद

। महाड । प्रतिनिधी ।
दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष चेतन उतेकर यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित मनसे चषक 2022 विद्युत झोतातील ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पधेत निखिल शिंदे मित्र मंडळ संघ विजेता ठरला तर दीपक जाधव मित्र मंडळ माणगाव या संघाला उपविजेते पदावर समाधान मानाव लागले. मर्यादित षटकाच्या या स्पर्धा ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखवता यावे यासाठी आयोजित करण्यात आल्या होत्या.

महाडची क्रिकेट पंढरी समजली जाणार्‍या शहरातील चांदे क्रिडांगणावर या भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये 32 संघाना या स्पधेत प्रवेश देण्यात आला होता. संपूर्ण स्पर्धा ही बाद पद्धतीने खेळविण्यात आली होती.या स्पर्धेच्या विजेत्या निखिल शिंदे मित्र मंडळ संघाला रोख रक्कम 50,000 आकर्षक चषक, उपविजेते दिपक जाधव मित्र मंडळ संघाला 25000 आकर्षक चषक, तृतीय क्रमांक जय हनुमान नवेनगर 10,000 आकर्षक चषक, चतुर्थ पन्हलघर 10,000 आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

या स्पधेत अष्टपैलू कामगिरी करणार्‍य योगेश पेणकर याला मालिकावीर पुरस्कर, उत्कृष्ठ फलंदाज शुभम जाधव, उत्कृष्ट गोलंदाज जयेश खैरकर यांना आकर्षक चषक देवून सन्मानित करण्यात आले. ही स्पर्धा युट्युबद्वारे टेनिस क्रिकेट डॉट इन माध्यमद्वारे प्रकाशित केली. अंपायर म्हणून गेली तीन दिवस गणेश गिरी, कुणाल सकपाळ यांनी काम पाहिले विद्युत प्रकाश योजना विजय टमके, समालोचनाच काम अजित अवसरे, मनोज वघरे, रुपेश महाडिक यांनी पाहिले तर गुणलेखक म्हणून प्रथमेश यांनी, परेश गांधी यांनी कामगिरी पार पडली. ही स्पर्धा यशस्वि करण्या करिता मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली आदीनी मेहनत घेतली. गेली अनेक वर्ष चेतन दादा उतेकर यांच्या वतीने महाड मध्ये विद्युत झोतात टेनिस बॉल क्रिकेटचा थरार पहावयास मिळतो.

Exit mobile version