| पनवेल | प्रतिनिधी |
माझा लोकसभेची संबंध काय, माझा याच्याशी संबंध नाही, मी आमदार आहे. माझा याच्याशी संबंध नाही, मी नगरसेवक आहे. माझ्यापुढे बसत नाही. हे व्यक्तिवाद करणारी मंडळी लोकप्रतिनिधी असू शकत नाही. या ठिकाणी दुर्दैवाचं आहे की या दोन्ही माणसांना निवडून देताना अनेकांनी पैसे घेऊन मते दिली. माझी आपल्याला विनंती आहे, डोळसपणाने मतदान करा. लोकसभेची निवडणूक होऊ द्या. नंतर आपण महापालिकेचा विचार करू. पासपोर्ट कार्यालय पनवेलला येण्याऐवजी अलिबाग येथे कधी केलं त्याचा आपल्या आमदार खासदारांना पत्ताही लागला नाही. पनवेल आणि कलंबोलीसाठी आरोग्य सुविधा एमजीएम येथे आहे, पण खारघरला मात्र ती सुविधा नाही. महानगरपालिकेच्या क्षेत्रातल्या घराच्या मालमत्ता करा बाबतीत त्यांनी निर्णय घेतला नाही. खासदार बारणे यांना मुलाला जेएनपीटीच्या वाहन तळाचा ठेका मिळवण्यासाठी वेळ मिळाला, परंतु नागरिकांचे कामे करण्यास वेळ मिळाला नाही, अशा खोचक शब्दात टीका केली.
यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना जिल्हा अध्यक्ष शिरीष दादा घरत, शिवसेनेचे समन्वयक केसरी पाटील, काँग्रेसचे कॅप्टन कलावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, काँग्रेसचे हेमराज मात्रे, युवा सेना महाराष्ट्र सहसचिव अवचित राऊत, खारघर फोरमचे मधुकर पाटील, शेकाप चे अजित अडसुळे, शिवसेनेचे शहर प्रमुख गुरुनाथ पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.