चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते प्रारंभ
| अलिबाग | प्रतिनिधी |
सासवणे ,ता.अलिबाग येथील विजय ऊर्फ बाबूशेठ शिलदणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे उद्धाटन शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे,सरपंच संतोष गावंड,माजी जि.प.सदस्य रविंद्र ठाकूर,रविना ठाकूर आदींसह हजारो कुस्तीप्रेमी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचे स्पर्धेच्या आयोजक नैनाताई शिलदणकर यांनी स्वागत केले.या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीपटू सहभागी झालेले होते.