पोटनिवडणुकीत भाजपला दे धक्का!

महाराष्ट्र,हिमाचलमध्ये काँग्रेस,दादरा नगरहवेलीत शिवसेना
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशभरातील तीन लोकसभा तसेच 29 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का देत विरोधकांनी सामूहिकपणे यश संपादित केले.महाराष्ट्र, हिमाचलमध्ये काँग्रेस तर पश्‍चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसने निर्विवाद यश संपादित केले.दादरा नगरहवेली लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकला आहे.13 राज्यांमध्ये या पोटनिवडणुकांसाठी 30 ऑक्टोबरला मतदान पार पडले होते. दादरा नगर हवेलीतून शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी निर्विवाद विजय संपादित केला आहे.
हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी लोकसभेच्या जागेवर 8766 मतांनी विजय मिळवला. जुब्बल कोटखाई विधानसभेच्या जागेवर काँग्रेसचे रोहित ठाकुर यांनी बाजी मारली. तर फतेहपुर विधानसभेच्या जागेवर काँग्रस उमेदवार भवानी सिंह यांनी 5789 मतांनी विजय मिळवला. तर अर्की मतदारसंघात देखील संजय अवस्थी या काँग्रेस उमेदवारानं विजय मिळवला आहे.
पश्‍चिम बंगालमध्ये दिनहाटा, शांतीपूर, गोसाबा आणि खरदा चार मतदार संघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत.
हरयाणाच्या एलेनाबाद विधानसभा मतदारसंघात अभय चौटाला निवडूण आलेले आहेत. हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभेची जागा काँग्रेस उमेदवार प्रतिभा सिंग यांनी जिंकली आहे. मेघालयातील तिन्ही जागांवर सत्ताधारी पक्ष विजयी झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपा उमेदवाराने विजय संपादित केला आहे. आंध्र प्रदेशच्या बडवेलमध्ये मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचा पक्ष वायएसआर काँग्रेसचे उमेदवार तब्बल 90 हजार मतांनी विजय मिळविला आहे. आहेत. राजस्थानच्या धारियावाड आणि वल्लभनगरमधून काँग्रेसचे नागराज मीना आणि प्रिती शेखावत यांनी विजय संपादित करीत भाजपला धक्का दिला आहे. आघाडी कायम राखली आहे. कर्नाटकच्या सिंदगीमध्ये भाजपा उमेदवार तर हंगालमध्ये काँग्रेस उमेदवार निवडूण आलेले आहेत.


देगलूरमध्ये पुन्हा काँग्रेसच
नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकी काँग्रेसने पुन्हा बाजी मारत मतदार संघात आपले वर्चस्व राखले आहे.काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी भाजपचे भाजपाचे सुभाष साबणे यांचा पराभव केला.या मतदार संघात वंचित बहुजन आघाडी तिसर्‍या स्थानावर गेली.जितेश अंतापूरकर यांना 1 लाख 8,840 तर सुभाष साबणे यांना 66,907 मते मिळाली.ही निवडणूक राज्यातील महाविकास आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती.भाजपने शिवसेेनेच्या साबणे यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली होती.पण साबणे यांच्या विरोधात काँग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेसने लढा देत भाजपला पराभूत केले.

Exit mobile version