कर्जतमध्ये विमानतळ नामांतरासाठी मानवी साखळी


दि.बा पाटील यांचे नावं द्या हजारो नागरिकांची मागणी
नेरळ | वार्ताहर |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यात 10 जून रोजी मानवी साखळी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत तालुक्यतील नेरळ येथील हुतात्मा स्मारक ते मानिवली येथील हुतात्मा स्मारक पर्यंत मानवी साखळी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात हजारो भूमिपुत्र, नागरिक, तरुण, महिला सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करण्यात आले.

गुरुवार दि.10 जून रोजी नेरळ शहरातील हुतात्मा स्मारकात हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या पुतळ्याना पुष्पहार अर्पण करून या आंदोलन सुरुवात करण्यात आली. नेरळ हुतात्मा स्मारक ते मानिवली येथील हुतात्मा स्मारक असे सुमारे 12 किलोमीटर पर्यंत हे मानवी साखळी लावून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तरुणांनी हातात झेंडे, फलक घेऊन घोषणाबाजी करत आंदोलन यशस्वी केले.

या आंदोलनात आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष सावळाराम जाधव, सुरेश टोकरे, मंगेश म्हसकर, राजेश भगत, अरुण कराळे, बाबीताई शेळके, रमेश मुंढे, मनीषा दळवी वसंत भोईर, अंकुश दुर्गे, शंकर घोडविंदे, सुनील गोगटे, अशोक ओसवाल, ज्ञानेश्‍वर भगत, महेश कोळंबे,कृष्णा हाबळे, गोरख शेप, शिवराम तुपे, विजय पाटील, राजू हजारे, वैभव भगत, सुधाकर डायरे, बबलू डायरे, प्रवीण शिंगटे, मनिष राणे, संदीप म्हसकर,विष्णू कालेकर, अतुल चंचे, जयेंद्र कराळे, जयवंत हाबळे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते।

सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 12 पर्यंत नेरळ, साईमंदिर, धामोते, दहिवली, मालेगाव, अवसरे, कोदिवले, मानिवली अशा अनेक ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची सांगता मानिवली येथील हुतात्मा स्मारकात करण्यात आली त्यानंतर सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने कर्जत तहसीदार यांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

Exit mobile version