टेक्निकल इस्टीट्यूटचा शंभर टक्के निकाल

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| आगरदांडा | प्रतिनिधी |

अंजुमन इस्लाम जंजिरा ही कोकणातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहे. त्याच्या अंतर्गत प्राथमिक शाळा, माध्यमिक हायस्कूल, जुनिअर कॉलेज, महाविद्यालय आणि औद्यीगिक प्रशिक्षण संस्था चालवली जात आहेत. अंजुमन इस्लाम जंजिरा संस्थाच्या अंतर्गत चालणाऱ्या अंजुमन इस्लाम जंजिरा सिद्दी जफर शेखानी मेमोरिअल टेक्निकल इंस्टीट्यूट मुरुड येथील मागील 47 वर्षांपासून कोकणाचे युवकांना तांत्रिक क्षेत्रात सक्षम बनविण्याचा काम यशस्वीरित्या करीत आहे. टेक्निकल इंस्टीट्यूट मुरुडचा शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या वार्षिक परीक्षेचा निकाल जाहिर झाले आहे. संस्थेत चालणाऱ्या चार ट्रेडमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून प्रत्येक ट्रेड मधील निकाल हा शंभर टक्के लागला आहे. सलग तीन वर्षापासून या संस्थेचा शंभर टक्के निकाल राहिला आहे. शेहबाज मलबारी याला मेकॅनिकल मोटर गाडी या ट्रेंडमध्ये 95.50 टक्के, सन्नी पाटील याला इलेकट्रीशनमध्ये 92.50 टक्के, कलीम आदमने याला डिझेल मेकॅनिक मध्ये 94.83 टक्के, आय्यान असिफ खोत याला वेल्डरमध्ये 84.33 टक्के, प्रतिश पाटील याला मेकॅनिकल मोटर गाडी या ट्रेंड मध्ये 91.83 टक्के तर कविराज बलकावडे याने इलेक्ट्रिशन प्रथम वर्षात 91.50 टक्के गुण मिळवले आहेत. या टेक्निकल इंस्टीट्यूट मध्ये 134 विद्यार्थी बसले होते व सर्व विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

Exit mobile version