रत्नागिरी | वृत्तसंस्था |
समुद्रामध्ये उद्भवलेल्या मासळी दुष्काळामुळे 20 ते 25 दिवस बहुतांशी नौका हर्णै बंदरात आणि आंजर्ले खाडीत नांगर टाकून आहेत. मासेमारीला गेलेल्या काही मच्छिमारांना हात हलवत परत यावे लागले आहे. यामुळे मच्छिमार निराश झाले आहे.
रोजचा होणारा सर्व खर्च नौकामालकाच्या अंगावर पडत आहे. ट्रॉलर मासेमारीसाठी 10 ते 12 दिवसांसाठी जातात. दोन सिलिंडरच्या नौका या 5 ते 6 दिवसांसाठी जातात. सध्या मिळणार्या मासळीतून डिझेल खर्चही सुटत नाही. त्यामुळे सध्या मच्छिमार मासेमारीला जाण्यास धजावत नाहीत. किमान 150 ते 200 नौका हर्णै बंदरात उभ्या आहेत. उर्वरित 200 ते 300 नौका आंजर्ले खाडीत अजूनही शाकारलेल्या अवस्थेत आहेत.