नेरळमध्ये मूकमोर्चा शेकडो हिंदूंनी घेतला सहभाग


। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील बोरगाव गावातील आकाश पाटील या तरुणाला मुस्लिम तरुणांनी नेरळ सीएनजी पंपावर मारहाण केली होती. त्या विरोधात शनिवारी (दि.11) कर्जत तालुक्यातील समस्त हिंदू बांधवांनी नेरळ पोलीस ठाण्यावर मुक मोर्चा काढला. यावेळी नेरळ गावात तब्बल दीड किलोमीटर लांबीची रांग लागली होती.

बोरगावमधील तरुण आकाश पाटील या हिंदू तरुणाला मुस्लिम धर्मीय तरुणांनी 2ऑगस्ट रोजी मारहाण केली होती. आकाश पाटील या तरुणाच्या बहिणीची छेडछाड त्या मुस्लिम तरुणांनी केली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी कर्जत तालुका आगरी समाज संघटना यांच्या वतीने मुक मोर्चा करण्याचा निर्णय घेतला होता. त्या मुक मोर्चाला कर्जत तालुक्यातील हिंदू वकील यांनी पाठिंबा देत आणि तालुक्यातील 40 वकिलांनी पुढाकार घेत समस्त हिंदू धर्मीयांचा मुक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथून मुक मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून निघालेला मुक मोर्चा लोकमान्य टिळक चौकातून माथेरान-नेरळ रस्त्याने हुतात्मा हिराजी पाटील चौकातून छत्रपती शिवाजी महाराज अशी हुतात्मा भाई कोतवाल तसेच नेरळ खांडा गावातून कल्याण कर्जत रस्त्याने नेरळ पोलीस ठाणे येथे हा मुक मोर्चा पोहचला.

या मोर्चामध्ये कर्जत तालुक्यातील बहुसंख्य गावातील हिंदू सहभागी झाले होते. त्यात मुस्लिम धर्मीय यांच्याकडून मारहाण झालेल्या आकाश पाटील हा मुक मोर्चाच्या अग्रस्थानी होता. या मोर्चाच्यावतीने अ‍ॅड. दीपक गायकवाड, अ‍ॅड. अमोल सुर्यवंशी, अ‍ॅड. नरेश अहिर तसेच शाम कडव, अ‍ॅड. तुषार भवारे यांच्यासह काही हिंदूंनी निवेदन दिले.

यावेळी किरण ठाकरे, अ‍ॅड. अमोल सुर्यवंशी, अक्षय म्हात्रे, अ‍ॅड. नरेश अहिर, आकाश पाटील, विश्‍व हिंदू परिषदेचे नवी मुंबई उलवे अध्यक्ष हेमंत हजारे कोल्हारे तसेच कर्जत येथील अ‍ॅड. गायत्री परांजपे, सचिन धुळे भडवळ, नेरळमधील नम्रता कांदळगावकर, बोरगाव येथील ग्रामपंचायत माजी उपसरपंच अशोक पाटील, श्रेया चंचे, अ‍ॅड. सूर्यकांत मसणे, माधव कोळंबे, रवींद्र मसने, कांबरी यांनी मनोगत व्यक्त केले.

पुरावे नष्ट करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा
नेरळ पोलीस ठाणे येथे जिल्हा पोलीस उपअधीक्षक टी.टी. टेले यांनी हे निवेदन स्वीकारले. मोर्चेकरी यांच्याकडून ज्या सीएनजी पंपावर आकाश पाटील यांच्यावर हल्ला झाला. त्या नेरळ सीएनजी पंपाच्या मालकांनी सीसीटिव्ही फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनात केली.
Exit mobile version