सिंधुदुर्गातील शेकडो गावे इको सेन्सिटिव्ह

| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |

केंद्र सरकारने पश्‍चिम घाटातील इको-सेन्सिटिव्ह झोनसंदर्भात अधिसूचना जारी केली. त्यात सिंधुदुर्गातील 192 गावांचा समावेश आहे. तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग वनविभागाने आंबोली ते मांगेलीपर्यंतच्या पट्ट्यातील 25 गावांचा इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील इको सेन्सिटिव्ह झोनमधील गावांची संख्या 200 च्या वर जाणार आहे. इको सेन्सिटिव्ह झोनची सूचना जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारने खाण प्रकल्प, गौण खनिज उत्खनन तसेच वाळू उत्खननावर बंदी आणली आहे. माधव गाडगीळ समितीने दोडामार्ग तालुक्याचा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश केला होता. तर कस्तुरीरंगन समितीने हा तालुका इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळला होता.

Exit mobile version