माथेरानमध्ये गावजत्रेची शेकडो वर्षांची परंपरा

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान या शहरातील गावजत्रेला 125 वर्षांची परंपरा असून, येथील गावजत्रा उत्साहात साजरी झाली. या गाव जत्रेचा प्रवास माथेरानमध्ये आजही चर्चेचा विषय असून, समस्त गावकर्‍यांचा उपस्थितीत गावजत्रा यशस्वी झाली.

माथेरानची गाव जत्रा 125 वर्षांपूर्वी सुरू झाली. प्रथम जयराम मास्तर, बाबू सावंत, जोशी तात्या, श्रीपत दळवी, कृषा सुतार, रमेश तावडे, काशिनाथ सावत यांनी सुरू केली. पूर्वी ही जत्रा मोठी होत असे, त्यातच जे नगरपालिकेतील कामावर फैलावर असायचे त्याच्या साठीही जत्रा प्रामुख्याने असायची. त्यानंतर माथेरानमध्ये हळू हळू गावकीचे स्वरूप येऊ लागले. त्या काळात माथेरानमधील ही जत्रा कायम सुरू राहावी यासाठी मोठी मेहनत घेतली. सावंत मास्तर यांच्या घरी, रोशन वीला, डेल बंगाला आणि आता मटण मार्केटमध्ये जत्रा सुरू आहे. आषाढ एकादशी संपली की माथेरान पिसरनाथ जत्रा उत्साहात साजरी करण्यात येते.

ही जत्रा आजही तिसर्‍या पिढीकडून अविरत सुरू आहे. माथेरानची गावजत्रा म्हणजे एक खवय्यांना मेजवानी आहे. माथेरानच्या घराघरात जत्रेचा वाट्याचा खमंग दरवळत असतो. गावांसाठी एक वेगळा उत्साह आनंद असतो. त्यामुळे माथेरानची जत्रा इतर गावापेक्षा वेगळी आहे. पहाटे सात वाजता ग्राम दैवत पिसारनाथ मंदिरात समस्थ ग्रामस्थ ग्रामदैवत पिसारनाथ दहीभाताचा नैवद्य दाखवून तेथील शितला माता देवीची खणा नारळ यांनी ओटी भरून गावासाठी सुख समृध्दी साठी मनोभावे प्रार्थना केली जाते. या गाव जत्रेत संपूर्ण गावाचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. यावर्षीची गाव जत्रा यशस्वी होण्यासाठी गावकीचे प्रकाश सुतार, चंद्रकांत जाधव, कुलदीप जाधव, चंद्रकांत सुतार, शैलेंद्र दळवी, विकास पारटे, राजेश दळवी, प्रदीप घावरे, निलेश मढे, विठ्ठल पवार, दत्ता सनगरे, अनता शेलार, प्रदीप शिंदे, राजू जाबरे, राकेश मालुसरे, धोंडू कदम, वर्षा रोड्रिक्स आदी अनेक ग्रामस्थ ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version