| तेलंगणा | वृत्तसंस्था |
एका व्यावसायिकाचा मृतदेह पोलिसांना अपूर्ण जळालेल्या अवस्थेत सापडला होता. या व्यावसायिकाची हत्या कुणी केली असेल? याचा शोध पोलीस घेत होते. या प्रकरणात पोलिसांनी व्यावसायिकाच्या दुसर्या पत्नीला आणि आणखी दोघांना अटक केली आहे. तेलंगणाच्या व्यावसायिकाचा मृतदेह पोलिसांना कोडागु जिल्ह्यात सापडला होता. कर्नाटक पोलिसांनी हे गूढ उकललं आहे. या व्यावसायिकाच्या दुसर्या पत्नीने व्यावसायिकाची आठ कोटींची मालमत्ता हडप करण्यासाठी त्याला ठार केलं. त्यानंतर त्याचा मृतदेह ती 840 किमी लांब घेऊन गेली. मात्र पोलिसांनी हे गूढ उकललंच.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 ऑक्टोबरला पोलिसांना एक कोडागू या ठिकाणी असलेल्या कॉफी इस्टेट भागात एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा मृतदेह 54 वर्षीय रमेश नावाच्या व्यक्तीचा असल्याचं आणि रमेश व्यावसायिक असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर पोलिसांनी या खुनाचा माग काढत रमेशची दुसरी पत्नी निहारीका आणि तिचे साथीदार डॉ. निखिल राणा आणि अंकुर राणा या दोघांना अटक केली. हे तिघंही बंगळुरुमध्ये वास्तव्य करतात. या तिघांनाही अटक करण्यात आली. ज्यानंतर या हत्येमागचा उद्देश पोलिसांना समजला.







