दिल्लीच्या अक्षर-कुलदीपचा जलवा
| हैदराबाद | वृत्तसंस्था |
आयपीएल 2023 च्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानावर एका रोमांचक सामन्यात पराभूत केले. दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून आयपीएल 2023 मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला आहे. हैदराबाद संघाला 145 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 9 गडी गमावून 144 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मनीष पांडे आणि अक्षर पटेल यांनी 34-34 धावा केल्या. या दोघांशिवाय कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 21 धावा केल्या. आयपीएल मधील हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव आहे.
145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवातही चांगली झाली नाही. हॅरी ब्रूक पुन्हा अयशस्वी ठरला आणि तो 7 धावा करून बाद झाला. मयंक अग्रवालचाही झेल सुटला झाला आणि या जीवदानाचा फायदा घेत त्याने 49 धावांची खेळी खेळली. पॉवरप्लेमध्ये हैदराबादने 1 गडी गमावून 36 धावा केल्या. पण, त्यानंतर संघाने ठराविक अंतराने गडी बाद होत गेले. यामुळे संघ दडपणाखाली आला आणि संघाने सामना गमावला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात भुवनेश्वरने फिलिप सॉल्टला यष्टिरक्षक क्लासेनवी झेलबाद केले. यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी दुसर्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी केली. मिशेलला टी नटराजनने पायचित केले. मार्शला 15 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 25 धावा करता आल्या.
यानंतर वॉशिंग्टन सुंदरची घातक गोलंदाजी पाहायला मिळाली. आठव्या षटकात त्याने तीन बळी घेतल्या. सर्वप्रथम सुंदरने वॉर्नरला हॅरी ब्रूककरवी झेलबाद केले. त्याला 20 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 21 धावा करता आल्या. सरफराजने खराब खेळी केली. त्याने भुवनेश्वरकडे झेल सोपवला. सर्फराजला नऊ चेंडूत 10 धावा करता आल्या. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अमन हकीम खानही बाद झाला.
62 धावांत पाच गडी बाद झाल्यावर मनीष पांडे आणि अक्षर पटेल यांनी सहाव्या विकेटसाठी 60 चेंडूत 69 धावांची भागीदारी केली. अक्षर पटेल 18व्या षटकात बाद झाला. त्याला भुवनेश्वरने त्रिफळाचित केले. अक्षरने 34 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने 34 धावांची खेळी खेळली. यानंतर मनीष पांडे धावबाद झाला. त्याला 27 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 34 धावा करता आल्या. भुवनेश्वरने चार षटकांत 11 धावा देत दोन बळी घेतल्या. त्याचवेळी वॉशिंग्टन सुंदरने चार षटकांत 28 धावा देत तीन बळी घेतले. टी नटराजनने तीन षटकांत 21 धावा देत मिचेल मार्शचा महत्त्वपूर्ण बळी घेतल