बलीवरे शाळेत हायजिन बाजार

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील बलीवरे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी हायजिन बाजार हि संकल्पना राबविली. या बाजारात विद्यार्थ्यांनी 13 स्टॉल्स मांडले होते आणि त्या स्टॉलवर विद्यार्थी तसेच पालक वर्गाने खरेदीसाठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांना बाजारात गेल्यानंतर; चांगल्या प्रतीच्या वस्तूंची खरेदी कशी करावी आणि त्यासाठी कसे निरीक्षण करावे यांची माहिती मिळावी यासाठी विद्यार्थ्यांसाठी हि संकल्पना राबविली. या हायजिन बाजारात विद्यार्थ्यांना सात तर शाळेच्या शिक्षकांनी सहा स्टॉल मांडले होते. त्यात कापडी पिशवी, डिश वॉश, अगरबत्ती, कागदी पिशवीचे स्टॉलस शाळेकडून लावण्यात आले होते. तर विद्यार्थ्यांनी सरबत, लस्सी, ताक, भेळ असे खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते.

Exit mobile version