अलिबाग नगरपरिषदेतर्फे सफाई कामगारांचा सन्मानल
। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग नगरपरिषद, इकोसत्व इन्व्हरमेंटल सोल्युशन प्रा.ली., द इन्क्युबेशन नेटवर्क, सेकंड म्युस आणि व्हिडीके यांच्या संयुक्त विद्यमाने शहरामध्ये आदर्श घनकचरा व्यवस्थापन प्रणाली राबविण्यात येत असून या अंतर्गत शुन्य कचरा मोहिम, स्वछ सर्वेक्षण अंतर्गत कामे तसेच माझी वसुंधरा अंतर्गत येणारी कामे यशस्वीरित्या पार पाडली जात आहेत. कर्मचार्यांना दैनंदिन कामकाजात प्रोत्साहन मिळावे, त्यांचे मनोबल उंचवावे या अनुषंगाने स्वच्छता प्रिमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध विषयांचे मूल्यांकन करून विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. गुरुवारी नगरपरिषद मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, नगर विकास अभीयंता महेश डफळ यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
यामध्ये सर्वप्रथम कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागत समारंभ इकोसत्व प्रतीनिधी मल्हारी यांनी सांभाळताना मुख्याधिकारी अंगाई साळुंखे मॅडम, नगर विकास अभियंता महेश डफळे, नगरपरिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख जाधव, सुपरवायझर प्रकाश तांबे, रविंद्र गायकवाड, व्हिडीके सुपरवायझर विकास ढगे, नगरपरिषद टायपिस्ट राहुल गायकवाड यांना गुलाब वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर इकोसत्व सह-समन्वयक अम़ोल दाभाडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन बक्षिसे वितरण तसेच सफाई कर्मचारी करीत असलेल्या चांगल्या कामाचे कौतुक केले.
यावेळी घंटागाडीवरील बक्षीसांमध्ये प्रथम क्रमांक चालक संतोष जाधव, कर्मचारी संजय चनाल, द्वितीय चालक प्रसाद जाधव, कर्मचारी सुधीर पाटील, तृतीय चालक निलेश गायकवाड, कर्मचारी तेजस पत्रे तसेच झडाई महिलांमध्ये प्रथम दिपाली सोनावने, पुजा जाधव, द्वितीय ताराबाई गायकवाड, ममता पाटील, तृतीय मानीबाई पवार, सवीना पवार यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात आले.