। पुणे । प्रतिनिधी ।
‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र रक्षक’ हे ब्रीदवाक्य घेत मनसेने सभासद नोंदणीचा श्री गणेशा गुरुवारी (दि.25) पुण्यात केला. अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली सभासद नोंदणी केली. यावेळी त्यांनी मिश्किलपणे सदस्य करुन घेतल्याबद्दल पक्षाचे आभार मानले. तसेच महाराष्ट्रातील नागरिकांना सभासद होण्यासाठी आवाहन केले. सभासद झाल्यानंतर मोबाईलवर राज ठाकरेंची भाषणे, व्हीडीओ क्लिप, पक्षाच्या कार्यक्रमाचे संदेश येणार आहेत.