इंझमामची सारवासारव

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

रोहित शर्मा आणि इंझमाम-उल-हक यांच्यातील शीतयुद्धात आणखी एक अध्याय जोडला गेला आहे. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेतील सामन्यात भारतीय गोलंदाजांवर अप्रत्यक्षपणे बॉल टॅम्परिंगचा आरोप केला होता. इंझमामने भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवर टीका केली होती. ज्याने 16 व्या षटकात चेंडू रिव्हर्स स्वींग केला आणि त्यावरून इंझमामने आऱोप केला होता. त्यावर जेव्हा भारतीय कर्णधार रोहित शर्माला विचारले असता त्याने दिमाग खोलो जरा, असा सल्ला दिला. त्यावर आता इंझमामने प्रत्युत्तर दिले, परंतु यावेळी त्याने बॉल टॅम्परिंगचा आरोप करायचा नव्हता अशी सारवासारव केली. इंझमामने स्पष्ट केले की, मी कधीही भारतावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला नाही. रिव्हर्स स्विंगच्या असामान्य वेळेमुळे चेंडूवर बारीक नजर ठेवण्यासाठी अम्पायर्सना सावध करणे हाच माझा हेतू होता.

Exit mobile version