मी होणार स्वावलंबी उपक्रमांतर्गत उद्या शिलाई मशिन वाटप

आ. जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महिला भगिनींना सक्षम करण्याच्या उदात्त हेतूने मी स्वावलंबी होणार उपक्रम पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सुरू केला. या अंतर्गत महिलांना शिवणकला आणि फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण दिले. शिवाय, महिलांना रोजगार निर्मिती व्हावी या हेतूने त्यांना मोफत शिलाई मशीनही देण्यात येणार असून या शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकरी भवन येथे शनिवार दिनांक 11 जून रोजी सकाळी 9.30 वाजता शेतकरी भवन येथे आयोजित केला आहे.

महिलांनी स्वावलंबी बनून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे, तिच्यातील सुप्तगुणांना वाव मिळावा, यासाठी तिच्या पंखात बळ भरण्याचे काम पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले असून या अभिनव उपक्रमातून त महिलांना शिवणकला आणि फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण दिले. पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या वेश्‍वी संकुलातील शिवणकला प्रशिक्षण केंद्रात हे एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 50 महिलांना शिवणयंत्र मोफत दिले जाणार असल्याची माहिती पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी दिली.

त्यानुसार शनिवार दि. 11 जुन रोजी सकाळी 9.30 वाजता शेतकरी भवन येथे महिलांना शिलाईचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा परिषद सदस्य प्रियदर्शनी पाटील, उपनगराध्यक्ष अ‍ॅड मानसी म्हात्रे, नगरसेवक प्रदीप नाईक, चेंढरे ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आदी उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version