मुंबई | प्रतिनिधी |
नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांचे हे आरोप मंत्री नवाब मलिक यांनी फेटाळून लावले आहेत. फडणवीसांनी योग्य माहिती घेऊन बोलावं. मी कोणत्याही अंडरवर्ल्डशी संबंधित माणसाकडून संपत्ती घेतलेली नाही. फडणवीसांनी केलेले आरोप खोटे असून त्यांनी फोडलेले फटाके फुसके निघाले. जे काही आरोप करायचे आहेत ते करा मी बुधवारी हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे, असा इशारा मलिक यांनी दिलाय.
फडणवीसांनी केलेले आरोप खोटे आहेत. त्यांनी यंत्रणांकडे जावे. मी चौकशीला तयार आहे, असे आव्हान त्यांनी फडणवीसांना दिले आहे. मी कोणत्याही चौकशीली तयार आहे. नवाब मलिक काही घाबरणारा नाही. मी हसिना पारकरना ओळखत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.