केंद्राकडून जीएसटी चे एक लाख कोटी येणे बाकी
महाड | जुनेद तांबोळी |
महाड मध्ये आलेल्या पूरपरिस्थिती नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस मंत्र्यांसह भेट दिली. यावेळी त्यांनी महाड सह कोकणात झालेल्या नुकसानीची परिस्थिती पाहता राज्य शासनाने दिलेली मदत आणखी वाढवून द्यावी या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले.
राज्य सरकारने घोषित केलेली मदत ही वाढवुन देण्याचा प्रयत्न केला आहे. शासकीय निकषानुसार यापूर्वी देण्यात येणारी ५००० ही रक्कम वाढवून शासनाने १० हजार घोषित करून दिलासा दिला आहे. मात्र कोकणातील पूरपरिस्थिती आणि येथील नुकसान पाहता मदत आणखी वाढवून देण्यासाठी काँग्रेस मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे महाड मध्ये सांगितले. केद्रां कडुन GST सह विविध टँक्स चे १ लाख कोटी येणे बाकी आहे. मागच्या चक्रीवादळामध्ये प्रधान मंत्री गुजरातच्या बाँर्डरवर आले पण महाराष्ट्रात आले नाही आणि हजार कोटी दिले मात्र हे त्यांचे दायीत्व आहे. राज्यावर उपकार करत नाहीत अशा शब्दात तिकीची झोड उठवली. आपल्या घामाचा पैसा कडे विविध पद्धतीने NDRF कडे जातो. हा संपुर्ण देशात हा पैसा द्यायचा असतो एकट्या गुजरात ला नाही असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले. मागील एका वर्षात तीन वेळा आपत्ती राज्यावर आली राज्य सरकारने योग्य ती मदत तर केलीच पाहिजे. चिपळुन सह जिथे जिथे नद्याचां गाळ व बधांरे या बाबत देखील मुख्यंमत्र्यांशी बोलणार आहे असे पटोले म्हणाले.
यावेळी नाना पटोले यांच्यासह नसीम खान, भाई जगताप, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आदी काँग्रेस नेते उपस्थित होते. महाड बाजारपेठेत पाहणी करून त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांकडून पूरपरिस्थिती चा आढावा देखील घेतला. दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन नाना पटोले यांनी जगताप कुटुंबाचे सांत्वन केले.