आयसीसीचा सर्वोत्तम संघ जाहीर

भारताच्या विराट, सूर्याला स्थान

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आसीसीसीनं टी-20 विश्‍वचषकातील सर्वोत्तम संघाची घोषणा केली आहे. या संघात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली, सूर्यकुमार यादवचा समावेश करण्यात आला आहे. तर, भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची 12वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि अ‍ॅलेक्स हेल्स यांची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आलीय. यानंतर विराट कोहलीला तिसर्‍या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या सूर्यकुमार यादव, पाचव्या क्रमांकावर ग्लेन फिलिप्सचा त्याचबरोबर झिम्बाब्वेचा ऑलराऊंडर खेळाडू सिकंदर रझा सहाव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा ऑलराऊंडर शादबा खानची सातव्या क्रमांकावर निवड झाली. या संघात इंग्लंडचा ऑलराऊंडर आणि ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ सॅम करन आठव्या क्रमांकावर आहे. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नोर्खिया नवव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड दहाव्या क्रमांकावर आहे. तर, शाहीन आफ्रिदीला 11व्या क्रमांकावर ठेवण्यात आले असून, हार्दिक पांड्याची 12वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

सर्वोत्तम संघ-
एलेक्स हेल्स, जॉस बटलर, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रजा, शादाब खान, सॅम करन, एनरिक नॉर्खिया, मार्क वूड, शाहीन आफ्रिदी, हार्दिक पांड्या.

Exit mobile version