वाईन विक्रीला विरोध होत असेल तर निर्णय मागे घ्या – शरद पवार

| बारामती | प्रतिनिधी |
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावरुन जर विरोध होत असेल तर सरकारने हा निर्णय मागे घ्यावा,असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. गोविंदबाग या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकारच्या सुपर मार्केट मधील वाईन उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावर भाजपसह काही संघटनांनी विरोध केला आहे या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर ते बोलत होते.

वाईन आणि इतर जे काही आहे त्यात फरक जाणून घेण्याची भूमिका घेतली पाहिजे. ती भूमिका घेतली नाही आणि त्याला विरोध असेल तर सरकारने या सगळ्या गोष्टीसंदर्भात वेगळा विचार केल्यास माझा त्याला विरोध असण्याचं कारण नाही. – शरद पवार,राष्ट्रवादी अध्यक्ष


विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याने तो बदलल्यास त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही हा फार चिंताजनक विषय असल्याचं मला वाटत नाही. तरी काही घटकांना वाटत असेल तर राज्य सरकारने काही वेगळा दृष्टीकोन स्वीकारला तर त्याच्यात फारसं वावगं ठरणार नाही, असे ते म्हणाले.

Exit mobile version