प्रकाश आंबेडकरांचा इशार
| अकोला | वृत्तसंस्था |
मोहन भागवतांचे भाषण म्हणजे चोराच्या मनातले चांदणे… आपल्या हातात सत्ता आल्यास आपण नरेंद्र मोदी आणि भागवतांना जेलमध्ये टाकू असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरयांनी केलं आहे. ते अकोल्यामध्ये माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी लोकांना भडकावून मत घेतले जाण्याची शक्यता वर्तवली आहे. भागवतांच्या याच भाषणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. लोकांची मन खराब करणारे तेच आहेत. मोहन भागवतांचे भाषण म्हणजे चोराच्या मनात चांदणं आहे. त्यांनी मणिपूरमध्ये आणि मुसलमानांच्या संदर्भात तेच केलं, औरंगजेबाचं स्टेट्स ठेवल्यानंतर कारवाई करणारे तेच आहेत. दंगा माजवणारे आरएसएसच आहे. त्यामुळे आरएसएसने लोकांना आधीच सांगितलं की, आम्ही दंगली माजवून मतं घेणार आहोत. ही निवडणुकीसाठीची सारवासारव आहे. संघ आणि भाजप एकच आहे. आपण सत्तेत आल्यास बेकायदेशीर शस्त्रपूजन करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि मोहन भागवतांना तुरूंगात पाठवू, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.







