कंत्राटी सफाई कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी शेकाप आक्रमक
। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत काम करणार्या कंत्राटी सफाई कामगारांवर कंत्राटदाराकडून, तसेच महानगपालिकेच्या अधिकार्यांच्या संगनमताने होणार्या अत्याचाराविरोधात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला असून, कामगारांना योग्य न्याय न मिळाल्यास न्याय्य हक्कासाठी लढा उभारु, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले की, नौपाडा व उथळसर प्रभाग समिती क्षेत्रामध्ये घरोघरी जाऊन कचरा ंकलन व वाहतूक करण्याकरिता मे. अमृत एंटरप्रायजेस यांया बरोबर करारनामा केलेला आहे, तसेच त्याच शर्ती आणि अटींवर आपण सदर करारांमध्ये कामगार कायदेविषयक तरतुदी केलेल्या आहेत. परंतु, त्या तरतुदीचे पालन कुठलाही कंत्राटदार करीत नाही. यासंदर्भा आपल्या अधिकार्यांना तक्रारी करुनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
तसेच प्रत्येक कामगारास वर्षभरात 22 भरपगारी सुट्टी दिली पाहिजे. परंतु, कंत्राटदार 21 दिवसांचीच सुट्टी देतो. त्यामुळे 400 कामगारांच्या 4000 सुट्टयांचा फायदा कंत्राटदारास होत आहे. म्हणजेच वर्षाला जवळपास 25 लाख रुपयांचा घोटाळा होत आहे. कामगारांना गणवेशासाठी पैसे मिळतात, परंतु, त्यातील 50 टक्के रक्कमसुद्धा खर्च करीत नाहीत. ही बाब अधिकार्यांच्या वेळोवेळी लक्षात आणूनदेखील त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे. आतापर्यंत कुठल्याही सफाई कामगाराला ग्रॅज्युएटी मिळाली नाही, मग चार टक्के ग्रॅज्युएटीचे पैसे जातात कुठे, याचीदेखील चौकशी झाली पाहिजे. तसेच पगार महिन्याच्या 10 तारखेपूर्वी देणे बंधनकारक आहे. परंतु, सर्व कंत्राटदार 15 दिवस ते दोन महिने उशिराने पगार देतात. यामुळे कामगारांची मोठी अडचण होत आहे. घंटागाडीवरील कामगारास दरवर्षी एक जोडी गमबूट, हाताताील ग्लोज, मास्क, गणवेश, रेनकोट व इतर संरक्षण साहित्य पुरवणे कंत्राटदाराची जबाबदारी आहे. परंतु, याकडे कंत्राटदार टाळाटाळ करीत असून, कामगारांच्या जीवाशी खेळत आहेत, असा आरोप शेकापचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी केला आहे. कोरोना काळात कंत्राटी कामगारांना 300 रुपये प्रतिदिन कोव्हिड भत्ता देण्यात येणार होता, तोही अद्याप मिळालेला नाही. तो ताबडतोब देण्यात यावा, तसेच 2015-16 या कालावधीमधील कामगारांना वेतनाच्या फरकाची रक्कम व त्या 20 महिन्यांतील बोनस, रजेची रक्कम अद्याप पूर्णपणे अदा करण्यात आलेली नाही. आदी विविध मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्तांना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देण्यात आले. तसेच या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास कामगारांच्या न्याय्य हक्काकरिता लढा उभारणार असल्याचा इशारा यावेळी शेकापचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी दिला आहे.