। टोकियो । वृत्तसंस्था ।
करोनाचं संकट पाहता कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचं ऑप्शन कर्मचार्यांना दिला आहे. कर्मचारीही कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी घरातून काम करण्याला पसंती देत आहे. रोज ऑफिसला टापटिप जाणारे कर्मचारी आता कम्फर्टेबल कपड्यात घरून काम करतात. तसेच घरात सहज वावरतानाही अडचण येत नाही. असं असलं तरी जापानच्या एका कंपनीनं कर्मचार्यांसाठी अजब आदेश जारी केला आहे. जापानी ब्रोकरेज फर्म नोमुराने आपल्या कर्मचार्यांना सिगारेट पिण्यावर बंधनं आणली आहेत. तुम्ही ऑफिसमध्ये असा किंवा वर्क फ्रॉम होम करत असाल. कामाच्या वेळेत तुम्हाला सिगारेट पिता येणार नाही. कर्मचार्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कंपनीने हा नियम बनवला आहे, असं कंपनीने आपल्या आदेशात म्हटलं आहे.