उनपाचे फुटलेल्या गटाराकडे दुर्लक्ष

| उरण । वार्ताहर ।
उरण नगरपालिका हद्दीतील समस्यांकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याने येथील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोटनाका येथील मासळी मार्केट जवळील गटारावरील स्लॅब फुटून त्यावरील लोखंडी सळ्या बाहेर पडल्या आहेत. ते प्रशासनाच्या काही दिवसांपूर्वी निदर्शनास आणूनही तो दुरुस्त करण्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.

शहरातील वाहतूक कोंडी, अर्धवट नालेसफाई, रस्त्यांची दुरवस्था, गटारांची बिकट अवस्था, शासकीय बांधकामे निकृष्ट दर्जाची,पाणी समस्या अशा अनेक समस्यांचा सामना येथील जनतेला करावा लागत आहे. याबाबत प्रशासनाकडे पत्रकार व स्थानिक जनतेने वारंवार तक्रार करूनही त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. मात्र प्रशासनाचे अधिकारी वर्ग मात्र याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

Exit mobile version